मयुरी सुभाष काकडे हिचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक; राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उपकरणाची निवड

1 min read

पिंपरी पेंढार दि.२३:- श्री सदगुरु सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) या विद्यालयातील विद्यार्थीनी मथुरी सुभाष काकडे हिचा पुणे जिल्हा परिषद् पुणे, पंचायत समिती वडगांव मावळ (शिक्षण विभाग) खामशेत या ठिकाणी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात ता. मावळ जि. पुणे (३.८ वी ते 8 वी) द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तीने ‘हेल्पिंग स्टीक फॉर ओल्ड पसन, हे उपकरण तयार केले होते. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिच्या या उपकरणाची निवड झाली आहे.विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब कदम, मधुकर शिंदे, संस्कृति गाटे श्री रंगदास स्वामी शिक्षण संस्था आणे, या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरा
कदम बाळू भाऊराव प्राचार्य संजय राणे.पर्यवेक्षक ज्ञानदेव पाचांग्रे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय समित्यांचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्य पिंपरी पेंढार या सर्वांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.तसेच पिंपरी पेंढार गावच्या सरपंच सुरेखा वेठेकर, उपसरपंच अमोल वंडेकर यांनी विशेष कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे