१६ एप्रिलला लोकसभा निवडणूक! व्हायरल पत्रावर निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

1 min read

नवी दिल्ली दि.२४- लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही १६ एप्रिल ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार या चर्चाना आता लगाम लागला आहे. निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरणे द्यावे लागले आहे. केवळ निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी व अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे १६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.अधिक माहितीनुसार भारतसरकार वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीने आगामी लोकसभा निवडणूक घेण्याच्या विचारात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता चर्चेला वेग आला आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय आहे नमूद ?

निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस १६ एप्रिल २०२४ घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व ११ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यावर भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात द्विटरवर पोस्ट केले आणि ती तारीख केवळ संदर्भासाठी होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे