महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर दौऱ्यावर 

1 min read

जुन्नर दि.२४:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा जुन्नर तालुका दौरा गुरुवार दि. २५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. असा असेल दौरा दु. १.०० वा. – श्रीराम मंदिर नारायणगाव भेट, दु. १.३० वा. – श्री महादेव वाघ यांच्या निवासस्थानी जेवण,

शाम्पेन कंपनी शेजारी, नारायणगाव, दु. २.०० वा. – महादेव वाघ यांच्या कोल्ड स्टोरेज चे उद्घाटन शाम्पेन कंपनी शेजारी, नारायणगाव, दु. २.३० वा. :- येथे चिल्हेवाडी बंदिस्त पाईप लाईन योजनेचे भूमिपूजन आळेफाटा, २२ गावांना पाणीपुरवठा करणारी बेल्हे प्रादेशिक योजना भूमिपूजन कार्यक्रम, आळेफाटा, दु. ३.०० वा. – गांधी हॉस्पिटल उद्घाटन, आळेफाटा,

दु. ३.३० वा. – यशवंत नागरी पतसंस्था नवीन इमारत उद्घाटन, पिंपळवंडी, दु. ३.४५ वा. – जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित शेतकरी मेळावा, पिंपळवंडी सायं. ६.१५ वा. – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आयोजित क्रिकेट स्पर्धा उद्घाटन, लेंडे स्थळ पिंपळवंडी, सायं. ६.३० वा. – रघुनाथ लेंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, लॅडेस्थळ पिंपळवंडी, सायं. ७.०० – पुण्याकडे प्रयाण

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे