जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष VJNT सेल च्या अध्यक्ष पदी सावकार पिंगट यांची निवड
1 min read
जुन्नर दि.२५:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सावकार पिंगट (बेल्हे, ता .जुन्नर) यांची गुरुवार दि.२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन गौरवण्यात आले.
पिंगट यांनी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे केले असुन आपल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष VJNT सेल च्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आले असल्याची माहिती पांडुरंग पवार यांनी दिली.
पिंगट यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हंटले आहे की, आपल्या अनुभव, ज्ञान, संघटनकौशल्याचा वापर करून आपण यांचे विचार व कार्यकर्तृत्व सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचे काम करावे हिच अपेक्षा.
तसेच दिलीप वळसे पाटील (सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य), अतुल बेनके (युवा लोकप्रिय आमदार जुन्नर तालुका) यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करत आहोत याचा सार्थ अभिमान आपणास आहे.