राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्या जुन्नर तहसील कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन 

1 min read

जुन्नर दि.३१:- राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वर झालेल्या इडी कारवाईच्या विरोधात जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या वतीने घंटा नाद आंदोलन गुरुवार दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जुन्नर तहसील कार्यालयासमोर होणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेस व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट ,सर्व पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजता तहसीलदार कचेरी या ठिकाणी जमावे असे आवाहन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे