पोपटराव वाघमारे तेजूरकर यांची भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

1 min read

पुणे दि.१४:- जुन्नर तालुक्यातील तेजूर गावचे पोपटराव वाघमारे तेजूरकर (सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पुणे ग्रामीण) यांची भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातील (राजगुरूनगर खेड) येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या समवेत ही निवड झाली.वाघमारे हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक पुणे ग्रामीणचे अधिकारी होते. त्यांची सामाजिक, राजकीय व सर्वसामान्यांच्या समस्यांची व समस्या सोडविण्याबद्दलची तळमळ पाहता व ग्रामीण भागातील एक बहुआयामी व्यक्तीमत्व पाहून व आपल्या सामाजिक बांधिलकीची आवड पाहता त्यांना भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष (अ.जा.) यांचा प्रवेश झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातून व पुण्यातील कार्यकर्ते व तेजूरकर व्यक्त करत आहेत.या कार्यक्रमप्रसंगी सन्मा.विनोद भालेराव (भा.ज.पा पुणे जिल्हा अध्यक्ष ), आशा बुचके ( जिल्हा नियोजन समिती), शरद बुट्टे पाटील ( भा.ज.पा.खेड अध्यक्ष ), दिलीप गांजाळे (मा.सदस्य पं.स.जुन्नर), संतोष खैरे, अनिल मेहेर (माजी नगराध्यक्ष जुन्नर), जनार्दन मरभळ (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जुन्नर) उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे