राजुरीत उभारला १५१ फुट उंचीचा भगवा ध्वज
1 min readराजुरी दि.२३:- राजुरी (ता.जुन्नर) येथील श्री हनुमान देव व इतर देवस्थान कमिटी व सकल हिंदु समाजाच्या वतीने बसविण्यात आलेल्या १५१ फुट उंच असलेला भगवा ध्वजारोहण अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून ध्वज पूजन करण्यात आले त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी प्रभु रामचंद्र की जय असे भजन म्हणत पायी ध्वज दिंडी सोहळा काढण्यात आला त्यानंतर गावातील श्रीराम मंदिरात महाआरती होणार. झाल्यावर गुरूवर्य ह.भ.प.तुळशिराम महाराज सरकटे यांच्या शुभहस्ते ध्वज अनावरण सोहळा झाला. त्यानंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला. तसेच यावेळी गावातील गणेश मंडळ बाजारपेठ यांच्या वतीने ग्रामस्थांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.