बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर चे सलग १४ वे वर्ष

1 min read

आळे दि.२३:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी संचलित, मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) येथील वाणिज्य विभागातील सन 2006 च्या बॅचचा चौदावा स्नेह मेळावा कामशेत लोणावळा येथील रायकर फार्म हाऊसला उत्साहात पार पडला. सदर स्नेह मेळाव्यात दिवसभरात अनेक कॉलेज जीवनात असताना ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्या सर्व करण्यात आल्या. तसेच एकमेकांची चेष्टा, थट्टा करण्यात आली. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय यानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक नगर आणि आळे या परिसरातील सर्वजण उपस्थित होते. सदर स्नेह मेळाव्यात तत्कालीन प्राचार्य दाते, वाळुंज, खंदारे, कै.ठुबे आणि कानवडे यांच्या अध्यापनातील शिकवण्याच्या पद्धती व कौशल्यांना उजाळा देण्यात आला. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक मुखाने असा निर्णय घेतला की, ज्या महाविद्यालयामुळे आपण आज विविध क्षेत्रात कार्यरत आहोत त्यामुळे महाविद्यालयास वस्तुरूपात देणगी देण्याचे निर्धारित केले. सदर मेळाव्यासाठी सागर गुंजाळ, सचिन लेंडे, रमेश लेंडे, मंगेश बांगर, गणेश नांगरे, अमित कुटे, अमोल कुऱ्हाडे, मनोज टकले, नितीन औटी, रामदास पादीर, गणेश लेंडे, सुनिल गलांडे, सबाजी दिघे, नितीन पिंगळे, सचिन पिंगळे, प्रमोद लुनिया, संजीव औटी, निलेश औटी. रुपेश जाधव,रेश्मा पाठक,- तिवारी पल्लवी धोंगडे- दिवसे , कांचन हांडे- पानसरे, जुली इनामदार- शेख, केतकी केंद्रे- शेकटकर, माया पिंगट आदी उपस्थित होते. शेवटी तृप्ती कुटे- काळभोर, संदीप औटी व सुरेश कुऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाचे ऋण व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे