मंचर ला श्रीराम प्रतिष्ठानेनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

1 min read

 

 

मंचर दि.२२:-मंचरला अयोध्येत श्रीराम प्रतिष्ठानेनिमित्त राणा प्रताप प्रतिष्ठान, मैत्री हेल्थ व रॉयल क्रिकेट क्लब यांचे वतीने आयोजित रक्तदान शिबीरात पन्नास महिलांसह साडेतीनशे जणांनी रक्तदान केले, रक्त संकलन चक्रेश्वर फाऊंडेशन, चाकण ब्लड सेंटर चे डॉ.निर्मला बापट,भरत चौधरी यांच्या पथकाने केले.

या रक्तदान शिबीरास पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे दत्ता गांजाळे बाळासाहेब बाणखेले , डॉ हर्षद शेटे,दत्ता थोरात , संजय चिंचपुरे , वसंत बाणखेले,प्रा.अनिल निघोट , सुहास बाणखेले या मान्यवरांनी भेटी दिल्या.

यावेळी राणा प्रताप संस्था अध्यक्ष संतोष बाणखेले, संस्थापक भास्कर सावंत, संग्राम सावंत तर मैत्री हेल्थ चे बाळासाहेब पोखरकर अध्यक्ष,गौरी पोखरकर सचिव,प्रवीण गावडे उपाध्यक्ष, नवनाथ गावडे तर रॉयल क्रिकेट क्लब चे सचिन लोढे, सचिन चिखले, सचिन डोंगरे उपस्थित होते,

तर नियोजनात प्रकाश राजगुरु,प्रितेश गांधी, तुषार बाणखेले, रोहन खानदेशे, संदिप सावंत, जवेरीया शेख, रवी इंगवले,प्रितम गायकवाड, महेश माशेरे,सिद्धी कुंजीर, सुचिता गावडे यांनी सहभाग घेतला.सुत्रसंचलन मिथुन पांचाळ भारती मुळे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे