मॉडर्न स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात प्रभू श्री रामाचा जयघोष
1 min read
बेल्हे दि.२२:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) चे १९ वे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये प्रभू श्रीरामाचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांचा जीवनपट दाखवणारे नाटक सादर केले.
तसेच बाल चिमुकल्यांनी धार्मिक, पारंपारिक, देश भक्तीपर व आधुनिक प्रकारची नृत्य सादर केले. शाळेला उत्तुंग शिखरावर नेण्यासाठी अतोनात कष्ट करणाऱ्या शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांना ‘प्राइड ऑफ मॉडर्न’ पुरस्काराने मॉडर्न परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
प्राचार्या विद्या गाडगे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल लागत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमी कटीबद्ध असतात. गेली पंधरा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा उत्तम सुरू आहे. तसेच ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ नर्सरी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षका सारिका म्हस्के यांना देण्यात आला.
‘बेस्ट आर्ट परफॉर्मर ऑफ द इअर’ इयत्ता नववीची विद्यार्थिनी श्रद्धा मोहन बांगर हीला मिळाला. ‘शाळेचा बेस्ट स्टुडंट्’ हा पुरस्कार इयत्ता बारावीचा विद्यार्थी यश तिकोणे या विद्यार्थ्यांना मिळाला. या वेळी गेल्या वर्षात इयत्ता दहावी तसेच बारावीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.
‘उत्कृष्ट परफॉर्मन्स गर्ल’ आरोही रखमा झिंजाड इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी हिला व उत्कृष्ट परफॉर्मन्स बॉय इयत्ता पाचवीचा विद्यार्थी संदिप किसन राठोड याला मिळाला. विद्यालयाने सुरू केलेल्या मॉडर्न या वार्षिकाचे व मॉडर्न कॅलेंडर चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एसीएस कॉलेज चे प्राचार्य आनंद कुलकर्णी, आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पीएसआय रागिणी कराळे, जुन्नर पंचायत समिती माजी सदस्या अनघा घोडके, बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर, माळशेज निकेतन चे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ,
चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे,संस्थेचे संचालक भास्कर पवार, सुहास वेठेकर, सुरेश सोनवणे, गणेश गुंजाळ, भानुदास हाडवळे, बाळशीराम शेटे, भास्कर गाडगे,रामशेठ गटकळ, ज्येष्ठ मार्गदर्शिका सुमन ढवळे, प्राचार्या विद्या गाडगे, शिक्षक, विद्यार्थी, बेल्हे ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला मुलगा चांगला माणूस बनला पाहिजे एकाग्रता हे करिअरचे यश आहे.यूपीएससी मध्ये विद्यार्थी मराठी विद्यार्थी पुढे आले पाहिजेत तसेच मुलांना आवडीचा व्यवसाय करून द्या, त्यांच्या आवडी जोपासा असे आवाहन यावेळी आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमात बोलताना केले.