आळे येथे १० हजार लाडू चे वाटप; राम मंदिरात आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते महाआरती

1 min read

आळे दि.२३:- अयोध्येत २२ तारखेला राम मंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ऐतिहासिक क्षण, शेकडो वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान श्री राम अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान आहेत.

त्यानिमित्त जुन्नर तालुक्यातील गावागावांत आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

आळे (ता. जुन्नर) येथे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते राम मंदिरात महाआरती संपन्न झाली तसेच आळे गावात नागरिकांना दहा हजार लाडू चे वाटप करण्यात आले.

गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये शेकडो राम भक्त सहभागी झाले होते. तसेच आमदार अतुल बेनके, गावचे सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांच्या सह अनेक नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे