श्री.जे.आर गुंजाळ स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त परेड; सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण
1 min read
आळेफाटा दि.२६:- श्री.जे.आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज आळेफाटा (ता.जुन्नर) येथील या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण डॉक्टर पंजाबराव कथे तसेच दत्तात्रय आरोटे मिलिटरी ऑफिसर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गुंजाळ तसेच सेक्रेटरी मीना गुंजाळ व डॉ दिपक हांडे, गोपीनाथ कुटे पालक व माजी विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता झाली.
शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. खास असे आकर्षण विद्यार्थ्यांची सुंदर परेड होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण आणि देशभक्तीपर गीताने वेधले. वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविधतेतुन एकता अशा वेशभूषा केल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरीता लेंडे व विष्णू भोसले यांनी केले. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या च्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विठ्ठल मस्के व पूनम शेळके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.