अतुल सांस्कृतिक महोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात पार; विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मिळाला वाव 

1 min read

नारायणगाव दि. ३१:- अतुल सांस्कृतिक महोत्सव २०२४’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झला. हा महोत्सव म्हणजे तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आपल्या कला कौशल्यांची अनुभूती घेण्याची एक पर्वणीच असते.

जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विशेषतः जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यातील सभाधीटपणा, आत्मविश्वास वाढला पाहिजे, विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे या उद्देशाने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

या महोत्सवात अनेक रसिकांनी आणि पालकांनी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहनृत्यांचे उत्कृष्ट सादरीकरण पाहिले व नृत्याचा आनंद घेतला तसेच या मुला मुलींचे कौतुकही केले. या महोत्सवामध्ये काल अतुलनीय सादरीकरण करणाऱ्या शाळांना आकर्षक चषक व विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

अतुल सांस्कृतिक महोत्सव २०२४ निकाल -: प्राथमिक विभाग :-1) प्राचार्य सबनीस विद्यालय, जुन्नर, 2) शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम, जुन्नर, 3) जि. प. प्राथमिक शाळा, चिंचोली (मराठी), 4) जि प प्राथमिक शाळा भोसलेवाडी, 5) जि प प्राथमिक शाळा, उच्छिल

उत्तेजनार्थ बक्षीस 1)जि प प्राथमिक शाळा, खामगाव, 2)जि प प्राथमिक शाळा, नगदवाडी, 3)जि प प्राथमिक शाळा, बोरी बु.,4)जि प प्राथमिक शाळा खोडद, 5)जि प प्राथमिक शाळा, हिवरे खुर्द, 6)जि प प्राथमिक शिरोली, बोरी,7)जि प प्राथमिक शाळा, नवीनओझर, 8)जि प प्राथमिक शाळा, आर्वी, 9)जि प प्राथमिक शाळा, तांबे, 10) हिरा इंग्लिश मिडीयम स्कूल, खानापूर

-: माध्यमिक विभाग :-1) अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूल, नारायणगाव, 2) पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, निमगाव सावा,3) ब्रम्हनाथ विद्यालय, पारूंडे, 4) शिवनेरी विद्यालय, धोलवड, 5) शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर

उत्तेजनार्थ पारितोषिके 1) रंगदास स्वामी माध्यमिक आश्रमशाळा, आणे, 2) समर्थ गुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कूल (बेल्हे, बांगरवाडी), 3) गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यालय, नारायणगाव, 4) ज्ञानदा विद्यामंदिर, नारायणगाव, 5) रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरोली बु.,6) ज्ञानदा माध्यमिक विद्यालय, मंगरूळ, 7)अनु. माध्यमिक आश्रमशाळा, तळेरान, 8) श्री सद्गुरू सिताराम महाराज माध्यमिक विद्यालय, पिंपरी पेंढार, 9) हिरा इंग्लिश मिडीयम स्कूल (खानापुर), 10) रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय, वडगाव आनंद

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे