वळसे पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

1 min read

निमगाव सावा दि.१९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. निमगाव सावाचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम लगड यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची गाथा देशभरात नव्हे, तर परदेशातही पोहचली आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी नौदल उभारण्याचे पाऊल उचलणारे ते पहिलेच.

शिवरायांनी स्वराज्याची उभारणी करताना अनेक गडकिल्ले बांधले. शेतजमीन मोजणी, जलसंधारण यासारखी रयतेची कामे महाराजांनी केली असे मत यावेळी परशुराम लगड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, संचालक संदीप थोरात, परशुराम लगड, प्रदीप गाडगे, ओंकार भोर, सोमनाथ पवार, विश्वास शिंदे, सुशांत गाडगे, सागर गाडगे, निलेश घोडे, प्रा. अनिल पडवळ, प्रा. सुभाष घोडे, प्रा. शिवाजी साळवे, शांताराम गाडगे, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे