आळे येथे होलम काठीचे जंगी स्वागत
1 min readबेल्हे दि.२२:- सदा नंदाचा येळकोट भैरवनाथांच चांगभल अशी जयमल्हारच्या घोषात संगमनेर तालुका या ठिकाणाहून श्री क्षेत्र जेजुरी येथे जाणाऱ्या होलम काठीचे बुधवार (दि.२१) आळे (ता जुन्नर) येथे आगमन झाले. यावेळी या होलम काठीची आरती करण्यात आली. यावेळी आळे येथील ग्रामस्थांच्या वतीने या होलम काठीचे स्वागत करण्यात आले.
जेजुरी येथे माघ पौर्णिमेस होणा-या यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्यांचे मिरवणुकीत संगमनेर येथील होलम काठी सन बाराशे सालापासून आजपर्यंत ही काठी पालखी संगमनेर येथून येत असते या मानाच्या होलम काठीचे आळे आगमन झाले.
यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष करत व भंडा-याची उधळन करत ग्रामस्थांनी या मानाच्या होलम काठीचे स्वागत केले. यावेळी या काठी पालखीचा आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, माऊली कु-हाडे, नयना डोके, गावचे सरपंच प्रितम काळे, उपसरपंच ॲड. विजय कु-हाडे, मुकूंद भंडलकर, कान्हु पाटील कु-हाडे, नागेश कु-हाडे, अरूण गुंजाळ, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे,
नेताजी डोके, संदिप पाटील कु-हाडे, मंगेश कु-हाडे, संजय भुजबळ, उदयपाटील भुजबळ, शिरीष कोकणे, चंद्रकांत भुजबळ, विलास शिरतर, निलेश शिंदे, सुरेश शिंदे, खंडू कु-हाडे, बबन गुंजाळ, विशाल भुजबळ यांचेसह भाविक उपस्थित होते. या आरतीच्या कार्यक्रमानंतर या मानाच्या काठीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
त्यानंतर या मानाच्या होलम काठीचे जेजुरीकडे प्रस्थान झाले. यावेळी अनेक भाविकांनी या काठी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.