मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या विद्या गाडगे ‘प्राइड ऑफ मॉडर्न’ पुरस्काराने सन्मानित
1 min read
बेल्हे दि.२१:- माळशेज निकेतन संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) शाळेला उत्तुंग शिखरावर नेण्यासाठी अतोनात कष्ट करणाऱ्या शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांना ‘प्राइड ऑफ मॉडर्न’ पुरस्काराने मॉडर्न परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
प्राचार्या विद्या गाडगे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल लागत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमी कटीबद्ध असतात. गेली पंधरा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा उत्तम सुरू आहे.
माळशेज निकेतन चे संस्थापक सीए सावकार गुंजाळ व संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात हा पुरस्कार दिला गेला.तसेच या वेळी ‘उत्कृष्ट शिक्षक ‘ पुरस्कार नर्सरी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षका सारिका म्हस्के यांना देण्यात आला.
बेस्ट आर्ट परफॉर्मर ऑफ द इअर इयत्ता नववीची विद्यार्थिनी श्रद्धा मोहन बांगर हीला मिळाला.
या वर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार इयत्ता बारावीचा विद्यार्थी यश तिकोणे या विद्यार्थ्यांना मिळाला.
गेल्या वर्षात इयत्ता दहावी तसेच बारावीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.