मॉडर्न मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

1 min read

बेल्हे दि.१५:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) या ठिकाणी राजमाता, राष्ट्रमाता, वीर माता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.

या वेळी प्राचार्या विद्या गाडगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी आराध्या गुंजाळ हिने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली.

सानिका डुकरे या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट उलगडला तर परिधी कोरडे या विद्यार्थिनी मी जिजाऊ बोलते या विषयातून जिजाऊंचे आत्मकथन केले.

इयत्ता पाचवी तील विद्यार्थिनींनी ‘जिजाऊ प्रशस्ती’ हे गीत सादर करून जिजाऊंना अभिवादन केले. स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्य आजही दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.

शिक्षणाचा मूळ हेतू हा व्यक्तिमत्वगुणांचा विकास करणे हा आहे . तसेच आपल्या मुलाला धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य या सर्वांचे धडे देण्याचे व त्याच्यात संस्कार निर्माण करण्याचे काम करणाऱ्या आदर्श मातेचे विचार जागरूक करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे