राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विद्यानिकेतनच्या विद्यार्थांची लाठीकाठीची धाडसी प्रात्यक्षिके
1 min readसाकोरी दि.१३:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, पीएम हायस्कूल साकोरी (ता. जुन्नर) या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती शुक्रवार दि.१२ रोजी मोठ्या उत्साहामध्ये पार पडली.
यावेळी शाळेचे अध्यक्ष पी.एम साळवे, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी चे प्राचार्य अमोल जाधव, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्य रूपाली पवार भालेराव तसेच पीएम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सुनीता शेगर यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये अनेक छोट्या छोट्या विद्यार्थिनी जिजाऊमातांना वंदन करून सुंदर नृत्य सादर केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी जिजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर भाषणे सादर केली.
स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. हे ओळखून मुलींच्या संरक्षणासाठी लाठीकाठी प्रशिक्षण क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. व त्याचे धाडसी प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवण्यात आले.
अशा प्रकारच्या प्रशिक्षणाने अनेक विद्यार्थिनींचा आत्मविश्वास उंचावला आहे तसेच स्वरक्षणासाठी देखील विद्यार्थिनी तयार झालेल्या आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल बारवे व प्रियंका शेवाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन संकुलाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.