जिल्हा परिषद शाळा वडगाव आनंदच्या बाल आनंद मेळाव्यात २८ हजारांची कॅशलेस उलाढाल
1 min read
वडगाव आनंद दि.२१:- वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्यानिमित्त सालाबादप्रमाणे भरणारा आठवडे बाजार भरवण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
या बाजारातील यावर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी आपल्या माता पालकांचे असणारे महिला बचत गटामुळे नँँशनल बँकाचे असणारे क्यू आर कोड वापरून डिजिटल पध्दतीने मोठ्या प्रमाणात व्यवहार केले. याबाबतची माहिती शाळेचे शिक्षणतज्ञ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डी.बी. वाळूंज यांनी दिली.
सदर बाजार हा ग्रामपंचायत व सोसायटी कार्यालयाच्या ओट्यावर दरवर्षीप्रमाणे भरविण्यात आला होता. नागरिकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा बाजाराची उलाढाल २८ हजार ३९६ इतकी झाली असून मागील वर्षाचे भरलेल्या बाजाराची उलाढाल रक्कमेपेक्षा जास्तीचा आकडा यावर्षी पार करण्यात शालेय विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
या उलाढालीमुळे मुलेच नव्हे तर विशेषतः माता पालक यांचेमध्ये अधिकचे समाधान दिसून येत होते. त्यांची मुले-मुली या बाजारात असणाऱ्या भाजी, खाऊ, कडधान्य याचे बिनचूक आर्थिक व्यवहार हाताळत होते. तसेच खाऊ गल्ली देखील या बाजारातील ग्रामस्थांचे मन वेधून घेत खाण्यासाठी आमंत्रित करत होते.
या बाजारात लक्ष वेधून घेणारे दुकान जे ठरले ते शाळेतील परसबागेत सेंद्रिय पद्धतीने मुलांनी पिकविलेल्या व मुलांच्या खाऊन उरलेल्या भाजीची पूर्णपणे विक्री होताना दिसून आली. त्याचप्रमाणे या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाजार संपल्यावर शाळेतील मुलींनी स्वच्छतेचे महत्व गावातील नागरिकांना पटवून सांगताना बाजाराचा पडलेला कचरा स्वतः मुलींनी झाडून काढला झाडून घेत असताना आपल्या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा…सुंदर शाळा” या उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी त्या विसरल्या नाहीत.
दरम्यान या आठवडे बाजारास गावचे नवनिर्वाचित लोक नियुक्त सरपंच रेलीका अरुण जाधव, उपसरपंच ऋषिकेश गडगे, सदस्य गणेश भुजबळ, संतोष पादीर, संदीप गडगे, गोरक्ष देवकर, सोमनाथ गडगे, तसेच सदस्या अर्चना काशिकेदार, वंदना शिंदे, त्याचप्रमाणे सचिन देवकर, तानाजी देवकर, रवी औटी, पंडित वाळूंज, अँँड.रवींद्र देवकर, अँँड.बी.बी.गडगे, कृषी मित्र आढाव, लहू रायकर,
हरीनाना देवकर, गहिनीनाथ वाळूंज, नारायण वाळूंज, श्रीहरी शिंदे, राजू गडगे, नवनाथ वाळूंज, दत्तात्रय चौगुले, पोलीस पाटील, गणेश चौगुले, सिताराम वाळूंज, दत्तात्रय लाड, खंडू मोमीन, बाबाजी देवकर, विकास देवकर, गोविंद देवकर, नितीन शिंदे, तुकाराम वाळूंज, प्रदीप खिल्लारी, ग्रामविकास अधिकारी, श्याम वाळूंज, उमेश रायकर, तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, सतिश भिंगारदिवे, बबन शिंदे, रेश्मा कुटे, जयश्री देवकर,
कविता वाळूंज, आदी ग्रामस्थांनी या बाजाराच्या दरम्यान भेटी दिल्या. मुख्याधापाक सुनील ठिकेकर, शिक्षकवृंद संगीता कुदळे, वृषाली कालेकर, मनीषा इले, गौरी डुंबरे, शालेय व्यवस्थापन समिती, सामाजिक कार्यकर्ते डी.बी. वाळूंज, माता-पिता पालक व ग्रामस्थांनी सदरचा बाजार यशस्वी करणेसाठी विद्यार्थ्यांना भरघोस प्रमाणात प्रतीसाद दिला, त्यामुळे खऱ्या अर्थाने हा भरलेला बाजार अतिशय यशस्वी ठरला.
भाजी घ्या… भाजी…. ताजी भाजी’…… असा आवाज यावेळेस चिमुकली मुले देत होती. घरी मातांनी स्वतःच्या हाताने बनवलेले खाद्यपदार्थ तसेच मिठाई विक्रीस ठेवण्यात आले होते. स्थानिक नागरिकांचा या बाजारास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळेस मुलांना या वस्तूची किंमत व किती रुपयांना ती वस्तू विकली पाहिजे,त्याचे ऑनलाइन पेमेंट कसे करायचे, हे धडे देण्यात आले.