रानमळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केली ग्रामस्वच्छता

1 min read

रानमळा दि.२१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन मौजे रानमळा (ता. जुन्नर) येथे शुक्रवार दि.19 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते तसेच रानमळा गावच्या सरपंच सविता तिकोणे. माजी सरपंच सुरेश तिकोणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गुंजाळ, अंबिका महिला बचत गट अध्यक्ष स्नेहा बांगर, रानमळा तंटामुक्ती अध्यक्ष संकेत गुंजाळ, गावच्या ग्रामसेवक आशाताई दाते, सुखदेव दरेकर, मयूर गुंजाळ, यधोनाथ गुंजाळ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकाचे कर्मचारी, ग्रामस्थ राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीरार्थी स्वयंसेवक या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.“युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास” अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती ही संकल्पना घेऊन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रानमळा येथे स्वच्छ गाव समृद्ध गाव, शाश्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास, लोकसंख्या सर्वेक्षण इ.काम करण्यासाठी सात दिवशीय निवासी शिबिरासाठी दाखल झालेले आहेत.शिबिराच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवकांनी रानमळा गावची स्वच्छता केली. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर परिसर, स्मशानभूमी परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता करून कचऱ्याची विल्हेवाट लावली.शिबिरा दरम्यान मेजर रमेश खरमाळे यांनी पर्यावरण व पर्यटन, डॉ.दिलीप कसबे महाराष्ट्राची लोकसंस्कृती, सचिन भोजने करिअरच्या वाटा, कवी उत्तम सदाफळ व्यक्तिमत्व विकास या विषयावरती तज्ञ व्याख्यात्यांनी व्याख्याने दिली. तसेच स्वयंसेवकांनी गावामध्ये लोकसंख्येचा सर्वे करण्यास सुरुवात केलेली आहे अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांनी दिली.या शिबिर कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक वनराई बंधारा बांधणार असल्याचे गावच्या सरपंच सविताताई तिकोणे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आमच्या गावामध्ये स्वच्छता करून आम्हा गावकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. आम्ही ग्रामस्थ ही या विद्यार्थ्यांबरोबर विविध कामांमध्ये सहभागी होणार असल्याचे सरपंचांनी नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर कार्यक्रमाधिकारी प्रा.रवींद्र मोजाड, प्रा. राहुल सरोदे, प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. मोनिका जाधव यांच्या नियोजनात आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू असल्याचे माजी सरपंच सुरेशराव तिकोने यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे