शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यशाळा व हळदी कुंकू समारंभास प्रचंड प्रतिसाद!
1 min read
कळंब दि.१६:- शिवसेनेच्या वतीने कळंबच्या तिरंगा कार्यालयात पदाधिकारी कार्यशाळा व महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर, सचिन अहिर, उपनेते रघुनाथ कुचिक जिल्हाप्रमुख सुरेश भोर, ऊपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे. आघाडी जिल्हाप्रमुख श्रद्धा कदम, ऊपजिल्हाप्रमुख कलावती पोटकूले,तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, माऊली खंडागळे महिला तालुका प्रमुख प्रा सुरेखा निघोट, महिला
ऊपतालुकाप्रमुख पिंगळे ऊपतालुकाप्रमुख सचिन निघोट,भरत मोरे, नितीन भालेराव,युवासेना जिल्हा प्रमुख संदिप भैया शिंदे , ऊपजिल्हाप्रमुख प्रसन्ना डोके, पांडुरंग बनकर , बाबाजी शेठ कराळे , प्रा अनिल निघोट, सुनिल एरंडे.
हेमंत एरंडे, अरुण बाणखेले महेश घोडके, विनोद घुले, अजित मोरडे, सुदाम पडवळ ,कांतिलाल निघोट, सुमंत निघोट, अंकुश निघोट, संदिप निघोट, नितीन चासकर, मारुती चासकर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते, विशेषतः हजारावर महिला उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र व केंद्र सरकारमधील पक्ष कसे भ्रष्टाचार लपवायला एकत्र आलेत.
पण महागाई, बेरोजगारी, कामगार धोरण , अंगणवाडी सेविका संप यात अपयशी ठरले असुन जनतेपेक्षा त्यांना स्वताचंच पडलंय त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवाच फडकवण्याचा निर्धार सर्वानी केला.