मुरबाड तालुक्यातील नामवंत असणारे सुप्रसिद्ध मिमिक्री मॅन यांना जीवनदीप युवा पुरस्कार
1 min read
मुरबाड दि.१४:- जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कमलताई किसन कथोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय म्हसा आयोजित तालुक्यातील गुणवंत व्यक्तींचा गुणगौरव सोहळा दि.12 जानेवारी रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, जीवनदिप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, पंचायत समितीचे बांगर व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील नामवंत असणारे सुप्रसिद्ध मिमिक्री मॅन यांना जीवनदीप युवा पुरस्कार सन्मानित करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील एकलहरे गावातील एक मिमिक्री कलाकार चांगलाच लोकप्रिय आहे. गणेश देसले मिमिक्री मॅन अस हरहुन्नरी कलाकाराचं नाव आहे.मुलचा एकलहरे गावचा असलेला गणेश 50 पेक्षा जास्त प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब आवाज काढतो.