गंगेवाडी येथील बैलगाडा शर्यतीत फक्त दहाच गाडे प्रथम क्रमांकात!
1 min read
पारगाव दि १४:- जानेवारी आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील गंगेवाडी गावात तीनशे बैलगाडयापैकी चोरबाबा यात्रोत्सवात पहिल्या दिवशी आठ तर दुसरे दिवशी फक्त दोन बैलगाडे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, दुसऱ्यात ७४ तर तिसऱ्यात ७८ बैलगाडे आले. यात्रा मोठ्या थाटामाटात पार पडली. पहिल्या दिवशी विकास नायकोडी चाकण ११.२५ सेकंदात तर दुसरे दिवशी दुपारपर्यंत ब्रजेश धुमाळ पेठ ११.५ सेकंदासह घाटाचा राजा ठरले तर पहिल्या दिवशी गणेश तनपुरे चाकण व दुसरे दिवशी गोविंद खिलारी फायनल चे मानकरी ठरले.
यात्रेत प्राध्यापक सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख व प्रा अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांनी भेट देऊन ग्रामस्थ, यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसिद्ध बैलगाडामालक काका गवळी, संजय गोरे, अनिल पवळे, बाळासाहेब ईंदोरे, बाळासाहेब वाघ, सुनिल वाघ सुलतानपुर पत्रकार सुनिल तोत्रे, गुळाणी चे सरपंच संदिप पिंगळे, बाळासाहेब ढेरंगे, अनिल ईंदोरे उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतीत आपल्या अनाउन्सींगने लक्ष्मण बांगर, माऊली तळेकर, अर्जुन विधाटे यांनी बहार आणली यात्रेचे आयोजन नियोजनात सरपंच सचिन पानसरे, बाळासाहेब पवार, चेअरमन तुकाराम पानसरे, शंकर क्षिरसागर, ग्रा.पं.सदस्य प्रशांत पवार, प्रकाश कोळेकर, हनुमंत हांडे, बाळासाहेब बढेकर, राम बागल यांनी उत्कृष्ट सहभाग घेतला तर सूत्रसंचालन प्रविण बाळासाहेब कोळेकर यांनी केले.