श्री रंगदास स्वामी महाराज यात्रोत्सवात ८ लाख ८३ हजार रुपयांचा मसाला; ५० कढाया आमटीचा महाप्रसाद

1 min read

आणे दि.१३ :- श्रीरंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र आणे (ता. जुन्नर) येथे शुक्रवार (दि.५) पासून सुरू झाली होती. यावर्षी आलेल्या भाविकांना ५० कढाया आमटी केली होती. या वर्षी पहिल्यांदाच भाविकांना अल्प दरात घरी आमटी पार्सल देण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी ही माहिती दिली.

श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान ची यात्रा ही आमटी – भाकरीच्या महाप्रसादामुळे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा आमटी भाकरीचा महाप्रसाद येथे भाविकांसाठी बनवला जातो. यावर्षी ४० कढाया आलेल्या भाविकांचा जेवनासाठी व १० कढाया वाटपासाठी भाविकांना घरी प्रसादासाठी बनवण्यात आल्या होत्या.

यासाठी ३१४० किलो मसाला लागला असून यासाठी ८ लाख ८३ हजार रुपये खर्च आला आहे. ६००० ते ७००० किलो भाकरी आसपासच्या आठ ते दहा गावातून वाजत गाजत येत असतात. घरातील प्रत्येक माणसासाठी एक किलो पिठाच्या भाकरी व देवासाठी एक किलो अशा प्रत्येक घरातून भाकरी येतात.

येथील यात्रा उत्सवात स्वामींच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येत येत असतात. देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून श्री रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेल्या १३६ वर्षांपासून हरिनाम सप्ताह संपन्न झाला.

यंदा सोपान महाराज सानप, कान्होबा महाराज देहूकर, विशाल महाराज खोले, बाळू महाराज गिरगावकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, संतचरणरज वसंतगडकर, रामभाऊ महाराज राऊत यांचे या काळात कीर्तन सेवा संपन्न झाली.

शुक्रवारी (दि. १२) सकाळी भजन, श्री स्वामींच्या शाळिग्रामची मिरवणूक व महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद दिला गेला.
शनिवार (दि. १३) योगिराज महाराज गोसावी यांचे काल्याचे कीर्तन झाले.

यावर्षी संपूर्ण सप्ताहाच्या अन्नदानाचा खर्च मातोश्री मीराताई लक्ष्मण आहेर यांच्या ६५ व्या व लक्ष्मण धोंडीबा आहेर (गुरुजी) यांच्या ७५ व्या अभिष्टिंतन सोहळ्या निमित्त गावच्या माजी सरपंच डॉ. श्वेतांबरी दिपक आहेर, डॉ. दिपक लक्ष्मण आहेर, शितल किरण आहेर, किरण लक्ष्मण आहेर, अर्णव दीपक आहेर, विराज किरण आहेर, विवांश किरण आहेर परिवारातर्फे सप्ताह महाप्रसाद व यात्रा महोत्सव संपूर्ण खर्च करण्यात आला.

श्रींच्या महाआरती चे मानकरी व आमटी महाप्रसादाचे दानशूर अन्नदाते रामदास गुंजाळ (गुंजाळवाडी), कै.बाळाजी आहेर यांच्या स्मरणार्थ धोंडीभाऊ आहेर, निवृत्त आहेर व परिवार, कै.दत्तू आहेर यांच्या स्मरणार्थ सुमन आहेर व तुकाराम आहेर,सुषमा हाडवळे (राजुरी) व परिवार, कै.सुधाकर नांगरे यांच्या स्मरणार्थ सुहास व महेश नांगरे, वंदना उनकुले व परिवार, कै. पांडुरंग आहेर यांच्या स्मरनार्थ चंद्रभागा आहेर, विकास आहेर व परिवार हे आहेत.

या आमटी मसाल्यामध्ये हळद, मिरची, काळीमिरी, दालचिनी, लवंग, जायपत्री, मायपत्री, खसकस, जिरी, मोहरी,गुळ,गरम मसाला,धना पावडर,बेसन पीठ,खोबरे, तुरीची डाळ, तेल,शेंगदाणे,आमसूल, आमटीचा वेगळा स्पेशल मसाला अशा २० ते २१ पदार्थांपासून ३१४० किलो मसाला बनवला. तर ८ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च आला.

आळेफाटा पोलिसांचा चोख बंदोबस्त :- पोलिसांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही पोलीस सध्या वेशात भाविकांमध्ये फिरतहोते.आळेफाटा पोलिसांच्या वतीने मुख्य रस्ते व चौकात सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

५० कढया आमटी, ३१४० किलोचा आमटी मसाला तर ८ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च; ६००० ते ७००० किलो भाकरी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे