वडगाव कांदळीतील शंभु महादेव यात्रोत्सवात धावले २७७ बैलगाडे

1 min read

वडगाव कांदळी दि.११:- वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे शनिवार (दि. ६) व रविवार (दि. ७) असा दोन दिवसीय शंभु महादेव यात्रोत्सव उत्साहात पार पडला. यात्रोत्सवात शंभु महादेव प्रतिष्ठान आयोजित २०/२० बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण २७७ बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवयास मिळाला.फळीफोडचा मान राहुल झुंजार हांडे-देशमुख व दिवंगत मारुती रामभाऊ एरंडे यांच्या बैलगाड्यास मिळाला. अंतिम शर्यतीत ३० बैलगाडे धावले. यामध्ये राजु जवळेकर / संदीप भोकसे, रामनाथ वारिंगे / सचिन नवेल, तुषार डावखर/ विक्रम बोत्रे, बवन चव्हाण / मयूर हॉटेल मंचर, साहिल मुहें / ओमकार आवरी, बाळासाहेब साकोरे / राजवर्धन भागवत व बबन दुर्गुड हे पात्र ठरले. दोन दिवसांत सर्वात कमी १०.८७ सेकंदात आलेला गाडा (घाटाचा राजा) राजू वसंत जवलेकर / संदीप भोकसे यांचा ठरला. एकूण ८ लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली, अशी माहिती माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली. यात्रोत्सवास माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार, गणपत फुलवडे, माउली खंडागळे, पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी व महादेव शेलार यांनी भेट दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे