कल्याण- नगर महामार्गावर मोटारसायकल झाडाला धडकून एक ठार; एक जखमी
1 min readआणे दि.१५:- नगर- कल्याण महामार्गावर शनिवार दि.१३ रात्री १ वाजता दुचाकी झाडाला आढळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश अशोक जाधव व समीर बाळु जाधव हे दोघेही पळशी (ता.पारनेर) येथील राहणारे असुन हे दोघेही दि.१३ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास
जुन्नर तालुक्यातील शिरोली या गावी काही कामाच्या निमित्ताने मोटार सायकल (एम एच १६ ए यु ०१५२) वरून पारनेर कडून शिरोली च्या दिशेने जात असताना त्यांची मोटारसायकल नगर – कल्याण महामार्गावरील पेमदरा
गावाजवळ रस्त्याच्या कडीला असलेल्या वडाच्या झाडाला धडकल्याने यामध्ये समीर जाधव (वय १९) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास स्थानिक नागरीकांनी उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
या संदर्भाची फिर्याद प्रकाश जाधव (वय २० राहणार पळशी ता.पारनेर) यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.