एसटी बस चे एक्सेल तुटल्याने बस पलटी; २२ प्रवाशी जखमी
1 min readसंगमनेर दि.२७:- राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा (एम एच ०७ सी ९१४६) संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले शाळकरी विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहे. राहुरी येथून संगमनेर येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा संगमनेर जवळ अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही बस उलटली. या बसमध्ये असलेले विद्यार्थी या अपघातात जखमी झाले आहे. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. सुदैवाने अपघातात जीवित हनी झाली नाही. मंगळवार दि.२६ सकाळी राहुरी येथून संगमनेर येथे जाण्यासाठी बस निघाली. या बस मध्ये मोठ्या संख्येने शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नागरीक प्रवास करत होते. दरम्यान, ही बस भरधाव वेगात संगमनेर येथे निघाली होती. ही बस आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे जात असतांना पिंपरणे गावात बसचा रॉड अचानक तुटला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.तसेच बस ही रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे बसमध्ये असलेले अनेक विद्यार्थी हे जखमी झाले. या बसमध्ये अंदाजे ४५ ते ४८ प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती समजताच गावातील नागरीक घटनास्थळी आले. पोलिस देखील काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना स्थानिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारायसाठी दाखल केले.