नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महेश काठमोरे कार अपघातात ठार; दोघे गंभीर जखमी

1 min read

टाकळी ढोकेश्वर दि.२१:-नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथील टोल नाक्याजवळ ढोकी शिवारात बुधवार (दि.२०) रात्री ११.३० च्या सुमारास हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोरील झाडाला स्विफ्ट कार आदळल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई महेश तुकाराम काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

गाडी भरधाव वेगात असल्याने चालक साहील करीम हुसेन खान याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. काठमोरे हे सुट्टीला गावी गेले होते. सुट्टी संपून ड्युटीवर येताना हा अपघात झाला.पोलीस कॉन्स्टेबल महेश काठमोरे पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील असून या स्विफ्ट कारचा चालक साहील करीम
हुसेन खान व गणेश सचिन शिंदे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) गंभीर जखमी आहेत.

हे जखमींना नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.अपघाताची माहिती मिळतात स्थानिकांच्या मदतीने पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड यांनी जखमींना उपचारासाठी हलवले. यासंबंधी फिर्याद गणेश तुकाराम काठमोरे (वय ३६, रा. शिरापूर) यांनी दिली आहे. काठमोरे यांच्या जाण्याने जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे