धावत्या कंटेनरचा टायर फुटून उडाला जोरदार भडका; कंटेनरमधील ऑटो स्पेयर पार्ट्स जळून खाक

1 min read

आळेफाटा दि.१९:- ऑटो स्पेयर पार्ट्स घेऊन नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक-वाहकांनी उड्या मारून आपले प्राण वाचविले.

परंतु कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्सची राख झाली. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गवरील आळेफाटा बायपासवर सोमवारी रात्री दहावाजेच्या सुमारास घडला.चाकण एमआयडिसी मधील ऑटो स्पेयर पार्ट्स कंपनीतून पार्ट भरून (एन.एल.1 ए.एच. 1443) क्रमाकांचा कंटेनर पुणे-नाशिक महामार्गाने नाशिककडे जात होता.

दरम्यान आळेफाटा बायपासला अचानक या धावत्या कंटेनरचा टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनर चालकाने नियंत्रण मिळवून महामार्गाच्या बाजूला कंटेनर लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अचानक कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक व वाहक यांनी बाहेर उड्या मारल्या.

त्यामुळे दोघेही सुखरूप बचावले मात्र मागील बाजूच्या टायरने अगीचा भडका घेतला. वडगाव आनंद उपसरपंच ऋषिकेश गडगे, स्वप्नील देवकर, दीपक शिंदे, साहिल गडगे, शुभम गडगे यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आग आटोक्यात येत नसल्याने जुन्नर या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचरण करण्यात आले.

मात्र अग्निशमन वाहन नेहमीप्रमाणे जुन्नर येथून आळेफाटा येथे पोहोचन्यासाठी तीन तासाचा वेळ लागल्याने कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट्स जळाली.आळेफाटा पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या महिनाभरापूर्वी आळेफाटा याठिकाणी गॅरेज ला उभा असलेला ट्रक जळून खाक झाला. आळेफाटा या मध्यवर्ती ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध करण्याची तातडीची गरज निर्माण झाली असून वडगाव आनंद आणि आळे दोन्ही ग्रामपंचायतीनी पुढाकारपणा घेऊन अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध करून द्यावी अशी जनसामान्यांतून आग्रही मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे