लोकनेते नागरिक सहकारी पतसंस्थेच्या एटीएम मशीनचा पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते शुभारंभ 

1 min read

शिरोली तर्फे आळे दि.१५:- लोकनेते नागरिक सहकारी पतसंस्था शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) च्या एटीएम मशीन चा शुभारंभ खोडद फाटा येथील लोकनेते व्यापारी संकुलात सोमवार दि. 15 रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या वेळी शिरोली तर्फे आळे सरपंच प्रिया खिलारी, मंगेश बांगर (उपसरपंच बांगरवाडी), वैभव काळे संस्थापक अध्यक्ष, कल्पना काळे (सरपंच बोरी खुर्द), सुदाम काळे, संतोष काळे, अरुण शेटे,

उमाजी काळे, संपत बांगर, अनिल गडगे, विश्वास डोंगरे, दिनकर काळे, योगेश काळे, गोरक्ष शेटे, महेंद्र काळे, कांताराम शिंदे, संतोष शिंदे, निलेश निलख, संदेश शिंदे, ज्ञानेश्वर काळे, सुजाता चिंचवडे, विजय बेल्हेकर आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व या नूतन एटीएम मशीनला देखील शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे