आळे येथील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी २४ वर्षांनी आले एकत्र

1 min read

आळेफाटा दि.१५:- आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील २००० – ०१ बॅच मधील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा नुकताच पार पडला.

जवळपास २४ वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन वाणिज्य शाखेतील वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असुन माजी प्राचार्य दाते सर, वाळुंज सर, खंदारे सर, कै.ठूबे सर या शिक्षकांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवत महाविद्यालयासाठी मदत करू अशी माहीती माजी विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.

या स्नेहमेळाव्यामुळे सोनेरी आयुष्यातील रुपेरी आठवणी जागृत झाल्या व तसेच अनेकांना गहिवरून आले. व्हाटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थी यांना संघटित करून हा स्नेहमेळावा आपल्या गुरूजनांच्या साक्षीने आयोजन केले होते.

बऱ्याच वर्षानंतर जुने वर्गमित्र भेटल्याने गप्पांना, थट्टामस्करीला उधाण आलं होतं. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओळख, स्नेहभोजन तसेच लोणावळा या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गणपत लामखडे, शरद गाढवे, संजय कुंजीर, सुनिल शिंदे, सुनिल वाकचौरे, ऊर्मिला पाडेकर, सुरेखा जाधव, संगीता दिघे, रजनी फुलसुंदर, अविनाश वाळुंज, रवींद्र गुंजाळ, संतोष शिंदे , गणेश गुंजाळ,

उत्तम सहाणे, राजेश अवटे, बबन सहाणे, शिवाजी हाडवळे, राजकुमार हाडवळे, विकास जाधव, उमेश औटी, विकास वाजे, शरद ढेरांगे, विलास डावखर, संतोष गुंजाळ, सचिन डोके, संपत गुंड, सय्यद अब्दुल रजाक, मुकेश लुंगे, नीलेश जाधव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे