बोरी गावात बिबट्याची प्रचंड दहशत; आमदार अतुल बेनके यांनी दिली गावाला भेट; वन अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

1 min read

बोरी दि.१८:- जुन्नर तालुक्यातील बोरी बु. गावातील साईनगर जाधव मळा येथे बिबट्याने काही लोकांवर हल्ले केल्याची घटना उघडकीस आल्याने आमदार अतुल बेनके यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. बिबट्या मोटारसायकलच्या मागे लागल्याच्याही घटना या भागात घडल्या आहेत.आमदार बेनके यांनी प्रत्यक्ष बोरी गावात जाऊन भेट दिली आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.जुन्नर तालुक्यात बिबट आणि मानव हा संघर्ष आता आणखी गंभीर बनला आहे, मानवी वस्तीत बिबट्यांचे हल्ले आणि वास्तव्य वाढत चालले आहे. शेती, वाडी, वस्तीच्या भागात राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. यावेळी समवेत बोरी बुद्रुक ग्रामस्थ तंटामुक्ती अध्यक्ष- युवराज कोरडे, उपसरपंच- दिनेश जाधव, ऋषी जाधव, अमोल तान्हाजी कोरडे, सुरज गणपत जाधव, संजय जाधव, वैशाली संभाजी जाधव, संदिप जाधव, लक्ष्मण जाधव, लक्ष्मीकांत जाधव, अनिल कोरडे, अक्षय जाधव, अशोक शंकर कोरडे आदी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे