जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

1 min read

पुणे दि.६: पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २३३ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.

आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी १०, भोर ७, दौंड आणि इंदापूर प्रत्येकी १, हवेली १७, जुन्नर २६, खेड ८, मावळ ३६, मुळशी २८, पुरंदर ९, शिरुर १२ आणि वेल्हे तालुक्यातील ६८ अशा जिल्ह्यातील एकूण २३३ गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे.रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित तहसिल कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे