४० वर्षानंतर भेटणार सरदार पटेल हायस्कूलचे १० वीचे विद्यार्थी
1 min readआणे दि.८:- सरदार पटेल हायस्कूल अणे (ता.जुन्नर) येथे शिकणारे इयत्ता १० वीचे १९८३-८४ चे विद्यार्थी १४ जानेवारीला ४० वर्षानंतर एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे अणे येथील रंगदास स्वामी उत्सव देखील त्या कालावधीत असून स्वामींच्या पवित्र पावन भूमीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी खूप प्रसन्न मनाने एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले आहे.खरतर यातील बरेचसे मित्रमंडळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, गोवा या ठिकाणी राहत असून त्यातील बरेच जण नोकरीतून निवृत्त झाले आहेत. तर काही मित्रांना नातवंडे आलेली आहेत परंतु आजही एकमेकांना भेटण्याची आतुरता लागलेली आहे. त्यासाठी सुधीर आंबेकर, निवृत्ती शिंदे, एन बी आहेर, खंडू दाते, मारुती आव्हाड. धोंडिभाऊ शिंदे, भाऊसाहेब लामखडे, बाबाजी शिंदे, रामदास ढोले, मारुती बेलकर, भानुदास हाडवळे, भगवान गोत्राळ, विलास परांडे, बाळासाहेब गाढवे, शंकर शिंदे, साहेबराव शिंदे या सर्व मित्रांनी पुढाकार घेऊन एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे समन्वय भाऊसाहेब आहेर यांनी दिली.