ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंच यांना ३ दिवसीय प्रशिक्षण; पांडुरंग पवार यांच्या मागणीला यश
1 min readबेल्हे दि. ४:- पंचायत राज विभागामार्फत नवीन सदस्य, उपसरपंच व सरपंच व महिलांसाठी क्रांतीज्योत महिला प्रशिक्षण योजने अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन लवकरात लवकर करावे अशी मागणी
जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पवार यांनी पंचायत राज पुणेचे संचालक आनंद भंडारी यांच्याकडे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदना द्वारे केली होती.
या मागणीचा विचार करून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण वर्ग ८ ते १३ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार असल्याचे पत्र पंचायत राज प्रशिक्षण केंद्र सातारा यांनी ३० डिसेंबर रोजी दिले आहे.
पवार यांच्या मागणीला यश आल्याने तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी पवार यांचे आभार मानले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्य सरकारच्या ग्रामपंचायत विभागाने पत्राद्वारे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्य, सातारा या कार्यालयास जुन्नर पंचायत समितीकडून २७८ सरपंच सदस्यांची यादी प्राप्त झाली आहे.
यांचे प्रशिक्षण दिनांक ०८ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४ अखेर आयोजीत करण्यात आले आहे. दि.०८ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ७४+७७ असे
१५१ सदस्यांसाठी अदिवासी विकास प्रबोधनी जुन्नर येथे, दि.११ ते १३ जानेवारी २०२४ दरम्यान ग्रामपंचायत सभागृह राजुरी येथे ६४ + ६३ असे १२७ सदस्यांसाठी प्रशिक्षण होणार आहे.