जुन्नरच्या उल्हास नवले यांची भाजप किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
1 min readजुन्नर दि.१८:- जुन्नरच्या उल्हास नवले यांची भाजप किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी त्यांनी भाजप तालुका उपाध्यक्ष तसेच भाजप जिल्हा कमिटीवर सदस्य असताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झटणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा भारतीय जनता पार्टीने योग्य तो सन्मान करून त्यांना किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. यापूर्वी येणेरे गावचे सरपंच असताना त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच सुवर्णपदकाचे पुरस्कारराचे मानकरी आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे अठरा वर्ष चेअरमन होते. तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक राहिले आहेत. शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे सध्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच येणेरे ग्राम विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पंकजा ग्रामीण बिगर शेती महिला पतसंस्थेचे ते संस्थापक मार्गदर्शक आहेत. तसेच हरित शिवजन्मभूमि प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या श्री उल्हास नामदेव नवले यांना पक्षाने किसान मोर्चाचे जिल्ह्याउपाध्यक्ष करून सन्मान केला आहे. त्यानिमित्त सर्व जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच दाऱ्याघाट प्रश्न, मीना खोऱ्याचा पाणी प्रश्न, आणे पठार पाणी प्रश्न व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भरीव करणार आहोत असे त्यांनी सांगितले.