शिंदेवाडीचे अमोल शिंदे यांची भाजपच्या पुणे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

1 min read

आणे दि.२७:- भाजप जुन्नर तालुक्याचे माजी कार्याध्यक्ष अमोल शिंदे (रा. शिंदेवाडी ता.जुन्नर) यांची भाजपच्या पुणे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात केली. भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे यांनी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन गौरव केला.

यावेळी जिल्ह्यातील तसेच जुन्नर तालुक्यातील अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. अमोल शिंदे हे सर्वसामान्य घरातून आलेल्या व्यक्तीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला उत्तम ठसा उमटविला आहे.

गेली 11 ते 15 वर्ष सहकार क्षेत्रात व भाजप तालुका कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली जबाबदारी पार पाडली. पक्षाने त्यांच्या काळात अनेक निर्णयक्षम आंदोलने पार पाडली तसेच अनेक गरजवंताना शासकीय योजनेचे लाभ मिळवून दिला.

भविष्यात ही आणे पठार चा पाणी प्रश्न तसेच मीना खोरे चा पाणी प्रश्न प्रामुख्याने सोडवू असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जुन्नर तालुक्यामधील जनहिताच्या सर्व तक्रारी व प्रश्न लवकरच मार्गी लावू वेळ पडली तर मंत्रालयातून प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या नियुक्तीने तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे