पंचायत राज विभागामार्फत नवीन ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंच यांना ३ दिवसीय प्रशिक्षण द्या:- पांडुरंग पवार

1 min read

बेल्हे दि.२५:- पंचायत राज विभागामार्फत नवीन सदस्य, उपसरपंच व सरपंच व महिलांसाठी क्रांतीज्योत महिला प्रशिक्षण योजने अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन लवकरात लवकर करावे अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदे चे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी पंचायत राज पुणेचे संचालक आनंद भंडारी यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, नुकत्याच ५ ऑक्टोबर २०२३ या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया पार पडली. दि. २२/ २३/ २४/ ११ /२०२३ या कालावधीत उपसरपंच निवडणुक संपन्न झाली आहे.

या निवडणुकीत मोठया प्रमाणात नवीन व तरुण कार्यकर्ते व महिला यांना सदस्य, उपसरपंच व सरपंच म्हणुन काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज व कायदा याचे आकलन चांगल्या पदधतीने होणेसाठी सर्वांना प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे.

तरी आपल्या पंचायत राज विभागामार्फत नवीन सदस्य, उपसरपंच व सरपंच व महिलांसाठी क्रांतीज्योत महिला प्रशिक्षण योजने अंतर्गत ३ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन लवकरात लवकर करावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे