बेल्हे गावच्या उपसरपंच राजेंद्र पिंगट यांची बिनविरोध निवड

1 min read

बेल्हे दि.२४:- बेल्हे (ता.जुन्नर) ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजेंद्र बबन पिंगट यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बबन पिंगट व ग्रामपंचायत सदस्य नाजीम नसीर बेपारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

त्यातील सदस्य नाजीम नसीर बेपारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सभागृहात उपस्थित सतरा सदस्य व सरपंच असे अठरा सदस्यांनी राजेंद्र बबन पिंगट यांच्या निवडीला टाळ्या वाजवत सहमती दर्शवली.

शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलकडून राजेंद्र बबन पिंगट तर शिवसेना पुरस्कृत पॅनेलकडून नाजीम नसीर बेपारी यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला होता.

दुपारी एकनंतर नाजीम नसीर बेपारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.उपसरपंच पदासाठी राजेंद्र बबन पिंगट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने ते बिनविरोध उपसरपंच झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुरलीधर कोरडे यांनी घोषित केले.

” बेल्हे गावातील सर्व ग्रामस्थांसह सदस्यांना विश्वासात घेत गावचा विकास करणार” 

 राजेंद्र पिंगट, उपसरपंच, बेल्हे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे