गुंजाळवाडीच्या उपसरपंचपदी राहुल नंदाभाऊ बोरचटे यांची बिनविरोध निवड

1 min read

बेल्हे दि. २३:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राहुल नंदाभाऊ बोरचटे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी पवार यांनी दिली.

गुंजाळवाडीत असलेल्या ९ जागांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर सरपंच पदासाठी लोकनियुक्त पद्धतीने मतदान झाले होते त्यामध्ये नयना रामदास गुंजाळ विजय झाल्या.

त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांमधून गुरुवार (दि. २३) गावच्या सरपंच नयना गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक लोंढे मॅडम व निवडणूक अधिकारी पवार तसेच सर्व ग्रामस्थ व सदस्यांच्या उपस्थितीत राहुल बोरचटे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे