पिंपळवंडीच्या उपसरपंचपदी मयूर पवार यांची बिनविरोध निवड
1 min readपिंपळवंडी दि.२३:- पिंपळवंडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मयूर सुरेश पवार यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी दिली.
पिंपळवंडीत असलेल्या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान झाले होते, तर सरपंचपदासाठी लोकनियुक्त पद्धतीने मतदान झाले. त्यामध्ये मेघा राजेश काकडे विजयी झाल्या.
त्यानंतर, निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंचपदासाठी बुधवार ( दि.२२) गावच्या सरपंच मेघा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली व
ग्रामविकास अधिकारी गणेश औटी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सभेत ग्रामपंचायत सदस्यांमधून मयूर पवार यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी जाहीर केले.