निमगावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरु करा:- पांडुरंग पवार
1 min read
आणे दि.१०:- निमगावसावा (ता.जुन्नर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरु करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पांडुरंग पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली २८ वर्षे गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सातत्याने मागणी करत आहोत. परंतु अजुनही आमची शाखा झालेली नाही. निमगांवसावा हे गांव मंचर बेल्हे रस्ता राज्यमार्ग क्र. ११२ व नारायणगांव शिरुर रस्ता प्र.जि.मा.९ हे दोन रस्ते एकत्र येऊन पुन्हा विभक्त होतात.
याच्या मध्यावर वसलेले जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाची बाजारपेठ असलेले सुमारे ६ हजार लोकसंख्येचे गांव आहे. या गांवात प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैदयकिय दवाखाना, टेलिफोन एक्सचेंज, महावितरण शाखा अभियंता कार्यालय, पोलिस औट पोस्ट, महसुल मंडलाधिकारी कार्यालय,
अंगणवाडी बीट कार्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र, बँच पोस्ट ऑफिस, श्री पांडुरंग पाणी वापर संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा, ५ पतसंस्था, भीमाशंकर व विघ्नहर कारखाना गट ऑफिस, ८ अंगणवाडया, २ जि.प.शाळा, पंडीत नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
दिलिप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, श्री. पांडुरंग कनिष्ठ महाविदयालय, श्री पांडुरंग दुध संस्था, श्री शनैश्वर दुध संस्था, श्री गणेश दुध संस्था, श्री कृष्णा दुध संस्था, श्रीराम दुध संस्था, पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगांवसावा, श्री खंडोबा मंदिर ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ,
श्री संत काशिनाथ महाराज वस्तीगृह, श्री पांडुरंग ज्येष्ठ नागरिक संघ, २ पेट्रोलपंप, एचपी गॅस एजन्सी आदि शासकीय व निमशासकीय व खाजगी संस्था आहेत. या सर्व ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी पारगांव तर्फे आळे ५
कि.मी., बोरी बु।। ५ कि.मी. व बेल्हे ९ कि.मी. अंतरावर जावे लागते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन निमगांवसावा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मंजुर करावी.