आळेगावच्या सरपंच पदी सखाराम भंडलकर यांची निवड
1 min read
आणे दि.१०:- जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून व ओळख असलेली आळे (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवार दि.१० रोजी निवडणूक घेण्यात आली. सरपंच सविता भुजबळ यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी चार जणांनी अर्ज केला होता.यामध्ये सखाराम हनुमंत भंडलकर, दिगंबर सुखदेव घोडेकर,सोनाली अनिल वाघोले व लता दिलीप वाव्हळ या चार जणांनी अर्ज केले होते. यामध्ये सोनाली अनिल वाघोले व लता दिलीप वाव्हळ यांनी माघार घेतल्याने राहिलेल्या दोन जणांमध्ये गुप्त पध्दतीने निवडणूक घेण्यामध्ये आली.
यामध्ये १७ सदस्यांपैकी १ सदस्य गैरहजर होते. तर सखाराम हनुमंत भंडलकर यांना ११ मते पडली. तर दिगंबर सुखदेव घोडेकर यांना ५ मते पडल्याने सखाराम भंडलकर यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.तसेच निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून
मंडलाधिकारी दादाभाऊ काळे तसेच सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे,विशाल मुंगळे यांनी काम पाहिले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने सरपंच भंडलकर यांचा सत्कार करण्यात आला.