खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला लालपरीतून प्रवास; बस मधील प्रवाशी चकित

1 min read

पुणे दि.२०:- सोमवार (दि.२०) खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाच्या दौऱ्यावर असताना कोहिंडे बु. ते पाईट फाटा दरम्यान एसटीने प्रवास केला. खासदार एस टी बसल्यावर प्रवाशी चकित झाले व प्रवाशांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.

लालपरीने प्रवास केला नाही असा एक माणूस शोधून सापडणार नाही! ग्रामीण, दुर्गम भागाला शहरी भागाशी जोडणारी ही लालपरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या रोजच्या जीवनात दळणवळणासाठी महत्वाची भूमिका बजावत असते.

या प्रवासादरम्यान मायबाप जनतेशी, विद्यार्थ्यांशी, युवकांशी व ग्रामस्थांशी खासदारांनी संवाद साधला. या बसच्या वाहक या एक महिला भगिनी होत्या, ही माझ्यासाठी सुखावणारी बाब होती.

या सर्वांसोबत प्रवास करून खूप छान वाटलं! या प्रवासातल्या आठवणी ग्रामस्थांसोबत सेल्फी काढून कैद केल्या असल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी दिली.

तर आज खूप वर्षांनी मला लालपरीने प्रवास करण्याचा योग आला व बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या अस ही त्यांनी सांगितल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे