बेल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच यांचा जाहीर सत्कार; गावच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार:- आमदार अतुल बेनके
1 min read
बेल्हे दि.१५:- बेल्हे ( ता.जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम प्रसंगी आमदार अतुल बेनके, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार उपस्थित होते.
यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच यांचे अभिनंदन केले. बेल्हे ग्रामस्थांनी माझ्या सहकाऱ्यांवर मतदानरुपी आशिर्वाद देत जो विश्वास टाकला त्याबद्दल ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.
बेल्हे गावच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार बेनके यांनी दिले.