आमदार लंकेंचा पाथर्डी आणि मराठवाड्यातही झेंंडा !
1 min read
पाथर्डी दि.८:- पारनेर तालुक्यातील सात पैकी सहा ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त करतानाच आमदार नीलेश लंके यांनी पाथर्डी तालुक्यास मराठवाडयातही यशाचा झेंडा रोवला आहे.पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. लंके यांचे विश्वासू सहकारी रफीक शेख यांच्या पत्नी नसीम रफीक शेख या विजयी झाल्या असून.
शेख यांच्या नेतृत्वाखालील उत्तरेश्वर जनसेवा पॅनलचे सात सदस्य विजयी होऊन शेख यांनी करंजी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविले आहे. सुनील अकोलकर, गणेश आकोलकर, अर्जुन अकोलकर, अंबादास नजन, विमल अकोलकर, मनिषा भिटे व अर्चना गुगळे हे विजयी झाले.
मराठवाडयात बीड जिल्हयाच्या गेवराई तालुक्यातील उमापुर या सात हजार मतदार असलेल्या मोठया ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत लंके यांचे सहकारी किरण आहेर यांनी बाजी मारली आहे. या निवडणूकीत आहेर यांच्या मातोश्री निर्मला संभाजी आहेर यांनी १ हजार ८२१ मते घेत विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संग्राम भैययासाहेब आहेर यांना १ हजार ५२६ मते मिळाली.
कोरोना संकटात आ. नीलेश लंके यांनी केलेल्या कामाची राज्यात नव्हे तर देशात चर्चा झाली. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर किरण आहेर यांनी आ. लंके यांच्या पाद्यपुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या लोकनेत्याच्या कौतुकासाठी संपूर्ण गावाला जेवणही दिले होते.
करंजीचे रफीक शेख हे देखील आ. लंके यांचे अतिशय निकटवर्तीय माणले जातात. पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी दर्शन यात्रेवेळी शेख हे महत्वपुर्ण भुमिका निभाऊन ही यात्रा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत असतात. मंगळवारी शेख व त्यांच्या सहकऱ्यांनी पारनेर येथे येऊन आ. लंके यांची भेट घेतली. आ. लंके यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
नगर तालुक्यातील आरणगांव या आमदार नीलेश लंके यांच्या सासुरवाडीच्या ग्रामपंचायतीवरही आ. नीलेश लंके यांच्या समर्थकांनी झेंडा फडकवित ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून आणले. आरणगांवच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांचा पारनेर येथे आ. लंके यांनी सत्कार केला.