जुन्नर तालक्यातील २० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी चा झेंडा:- तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार
1 min readजुन्नर दि.७:- जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतचा निकाल लागले असून जुन्नर तालुक्यातील एकूण 26 ग्रामपंचायतीपैकी 20 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवल्याचा दावा जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केला आहे.
पांगरी तर्फे मढ, उंब्रज नंबर १, पिंपरी कावळ, बेल्हे, तांबेवाडी, रानमळावाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, शिरोली तर्फे आळे, कांदळी, पारुंडे, पाडळी, राळेगण, धालेवाडी तर्फे मिनेर, खामगाव, खटकाळे, निमगिरी, वडगाव आनंद, डुंबरवाडी, सांगनोरे या २० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवल्याचा माहिती पवार यांनी दिली.
तर बांगरवाडी (सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), पिंपळवंडी (सेना शिंदे गट) व नारायणगाव (सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बुचकेवाडी (अपक्ष), आंबेगव्हाण व सुकाळवेढे (सेना शिंदे गट) यांना मिळाल्याचं पवार यांनी सांगितले.