तरुणाने नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; महिना ५० हजार रुपये उत्पन्न
1 min read
बोरी दि.१४:- बोरी बुद्रुक येथील उच्चशिक्षीत असलेले शेतकरी बंधिस्त मेंढी पालन व्यवसाय करून महिन्याला पन्नास हजार रुपयांचा नफा मिळवत आहे.आजपर्यंत मेंढी पालन व्यवसाय हा पारंपारिक पध्दतीने करताणा अनेक वेळा पाहिले असेल.नगर जिल्ह्यातील मेंढपाळ हे आपल्या तालुक्यात येऊन मेंढया घेऊन दररोज गावोगावी फिरताणा दिसुन येत असतात. हाच व्यवसाय आपण आधुनिक पध्दतीने केला तर आपल्याला याचा फायदा लक्षात येईल. बोरी बुद्रुक (ता.जुन्नर)
येथील युवराज सिताराम कोरडे एम बी ए अग्री व सिताराम बबन कोरडे यांचे स्वताचे शिक्षण हे एम.ए.इकोनॉमिक्स पर्यंत शिक्षण असताना देखील चांगली नोकरी सुध्दा त्यांना मिळाली होती परंतु पहिल्यापासुन शेती व व्यवसायाची आवड असल्याने शेती करत असतना त्याला जोडधंदा म्हणुन मेंढी पालनाचा व्यवसाय करण्याचा ठरवला.
यासाठी सुरवातीला मुक्त गोठा २५×५० फुटाचा बांधुन घेतला. सुरुवातीला माडग्याळ या जातीच्या २५ मेंढ्या खरेदी केल्या व तीन महिने संभाळ करुन चांगला नफा मिळाला, सध्या दुसऱ्या लॉट मधे ४० मेंढ्या व शेळ्या ५० असुन यांचे संगोपन करत असताना या गोठ्याची स्वच्छता ठेवणे खुप गरजेचे असून
वेळोवेळी जंतनाशक व लसीकरण करणेही तितकेच महत्वाचे असते, त्यामुळे मेंढ्यांणा कोणत्याही प्रकारचा आजार पसरत नाही. तसेच यानां खाद्य म्हणुन घास,गवत मका तर तुरीचे भुस ,शेंगदाणा पेंड, कांडी पेंड दिले जाते.
या मेंढ्यांची चांगली जोपासना केल्याने तिन ते चार महिन्यात सांभाळुन ३०-४० किलो वजनाच्या मेंढ्या मार्केट मध्ये रोख स्वरुपात विक्री केली जाते.
——-
प्रतिक्रिया
‘माडग्याळ जातीच्या मेंढ्या बाजारात कायमचं चढ्या दराने विक्री होत असते. या जातीच्या मेंढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या मेंढ्या या दख्खनी मेंढ्यांपेक्षा उंच असतात. या जातीची मेंढी ही प्रामुख्याने लांब असते.तर या मेंढ्यांच्या शरीराची वाढ चांगली राहते. बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करत असतात नराचे वजन सर्वसाधारणपणे ४० ते ५० किलो दरम्यान असते. तसेच या जातीच्या मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असुन एका मेंढीची तिन महिन्यानंतर १० हजार रुपयापर्यत विक्री होत आहे.
तसेच सध्याच्या काळात सेंद्रिय खतांमध्ये शेळी व मेंढी च्या लेंडी खताची मागणी येऊ लागली आहे. प्रति ट्रोली रू ५-६ हजार दराने विक्री केली जाते, त्यातुनही चांगले उत्पन्न मिळत आहे.
युवराज कोरडे, व्यावसायिक