शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय योजना लागू करा; राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागणी
1 min read
अहिल्यानगर दि.१०:- राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर यांना कॅशलेस वैद्यकीय योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजारी पडल्यास या योजनेमुळे त्याच्या कुटुंबाल मोठा आधार मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार उपचार पूर्ण झाल्यावर फाईल जमा करून खर्च दिला जातो. मात्र, ही प्रक्रिया खूपच संथ आहे.
गंभीर आजार झाल्यास उसनवारी करुन शिक्षकांना उपचाराचा खर्च भागवावा लागत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते.