सोयाबीनचे १४ कट्टे चोरणाऱ्या तिघांना ओतूर पोलिसांनी केली अटक

1 min read

ओतूर, दि.३०:- मांदारणे (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्याचे ४७ हजार रुपयांचे १४ सोयाबीनचे कट्टे रविवारी (दि.२४) चोरीला गेले होते. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनीच हे कट्टे चोरले असल्याची कबुली दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.दिलीप रामा जाधव (वय २२), तुषार बाळू काळे (वय २२), प्रदीप नाथा काळे (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.तर सोयाबीन उत्पादक शेतकरी सुरेश भिकू महाकाळ यांनी फिर्याद दिली होती. दरम्यान, चोरट्यंकडून १३ हजार ४४० रुपयांचे सोयाबीन व ४२ हजारांची दुचाकी असा ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन लांडगे, पोलीस नाईक जनार्दन सापटे, पोलीस हवालदार महेश पठारे, नंदी लांडे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे